Posts

भर 20 लाख आणि चिकटून जा एकदाचा...

Image
 किती रेट चालू आहे? कमीत कमी 20 लाख  मग अभ्यास करावा की 20 लाख भरून नोकरी मिळवू. नसेल काही फरक पडत तुझ्या मनाला तर भर 20 लाख आणि घे नोकरी अस किती दिवस अजून struggle करणार,mess च खाणार, अभ्यासिकेची fees भरणार, महिना अखेर ला मित्रांना पैसे मागणार. भर 20 लाख आणि घे नोकरी. नोकरी मिळाल्यावर महिन्याला कमीत कमी एक दीड लाख तरी वर कमाई होईलच की, मग लाव हिशोब , वर्षाचे किती.. भर की मग 20 लाख, माझ्या कानावर जसा हा आकडा आला तसा तुझ्या पण कानावर आलाच असेल की, काहीतरी पत्ता सापडेलच दलालांचा. शोध मग. जीवघेण्या स्पर्धेतून अभ्यास करून post काढणं अवघड आहे, त्यापेक्षा 20 लाख जमवून ही पोस्ट मिळवणं सोप्प आहे.. भर 20 लाख. आणि पैसे बुडणार नाही. Sure shot guarantee आहे, post मिळणारच आहे. बघ newspaper मध्ये सुद्धा रोज येत आहेत असल्या बातम्या.. म्हणजे आपली बाजू मजबूत आहे.. तुला पण माहीत आहे , मला पण माहीत आहे, ह्या बातम्या newspaper मध्ये येतील जातील, सरकार काहीतरी statement देईल, आश्वासन देईल, पण असल परत परत कानावर पडतच राहणार, दर वर्षी हे असल काहीतरी कानावर पडतच राहील, मग भरूनच टाकू ह्या वर्षी हे 2...

तुझी भूमिका, तुझा न्याय, तुझ कर्तव्य

 तुझी भूमिका, तुझा न्याय, तुझ कर्तव्य कर्तव्याला न्याय दिलास तरच सुखाची झोप येईल, नाहीतर आतल्या आत काहीतरी खात राहील. बोलून शब्द पाळला नाहीस, तर शब्दांना किंमत उरणार नाही, अर्थ उरणार नाही. कुणाला कळो वा ना कळो , तुझ मनच तुझा न्यायनिवाडा करतच राहील आतल्या आत, तुझी मर्जी असो वा नसो. देनाऱ्याकडे द्यायला भरपूर आहे, पण तुझी झोळी नीट आहे ना, तिच्याकडे पण एकदा नजर टाक. तुझी माणुसकीची झोळी , स्वतःशी प्रामाणिक राहण्याची झोळी, कर्तव्याची झोळी फाटली तर नाही ना कुठे. फाटली असेल तर शिव तिला, वेळ कधीही गेलेली नसते, हीच ती वेळ . शिवत रहा शिवत रहा जो पर्यंत तुझच मंन न्यायनिवाडा करून तुला सांगत नाही.. शिवत रहा. मोठं- छोट, हार-जीत, सन्मान-अपमान, हुशारी-मूर्खपणा ई ई comes and goes, comes and goes, comes and goes.. मूर्खाच्या शब्दांना कधी किंमत येईल आणि शहान्याचा सुज्ञपणा कधी चिखलात जाईल,हे दिसेल तुला पण डोळे उघडे ठेवलेस तर. बदलतंय सगळं, प्रकृतीचा नियम, Change is permanent. क्षणभंगुर क्षणभंगुर क्षणभंगुर जीवन क्षणभंगुर, त्यातल्या व्यक्ती वस्तू परिस्थिती क्षणभंगुर. भावना,विचार, माया, प्रेम, दोस्ती क्षणभ...

गुलाल , कष्ट/मेहनत , आणि शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 गुलाल , कष्ट/मेहनत , आणि शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 Service मध्ये जावून किमान 8-10 वर्ष सगळे rules regulations follow करून Non corrupt राहून service दिल्यावर पण गुलाल उधळायला हवा. भाकरी साठी माझ्या आई वडिलांनी कष्ट केले आणि तुझ्या पण आई वडिलांनी कष्ट केले, पण त्यांनी कधी गुलाल उधळला नाही कुणीतरी ही परंपरा सुरू केली म्हणून ती follow च केली पाहिजे असं काही नाहीये. खरच त्यात गुलाल उधळण्या सारखं काय असतं ? ते फक्त दाखवण्यासाठी show off करण्यासाठीं आहे, असच भासताय. Show off करणारे अधिकारी /अधिकारिणी नको रे देवा आता, लई झालंय हे market मध्ये, अजिबात नको असलं आता काहीच ... गुलाल उधळावा, नक्की उधळावा पण काम केल्यानंतर....दादा, ताई with all due respect तू अजून काहीच काम केलं नाहीयेस. तुझा खरा संघर्ष आता सुरू झालाय (जर तू honestly काम करणार असशील तर),  Otherwise ह्या राज्याला आणि देशाला अजून एक corrupt अधिकारी/अधिकारिणी मिळाली म्हणून तू आणि तुझ्या आजूबाजूचे गुलाल उधळत असतील तर तुम्हाला सदा सर्व काळ शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐 @Sudarshanjaybhay

Notification काढल तर बरं होईल

 साहेब आमच्या मुद्द्याच राजकारण करण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल, साहेब आम्हाला Meeting च आश्वासन देण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल,  काहीच नाही मागितलं , फक्त अभ्यासासाठी थोडा वेळ मागितला आहे, त्यामुळे notification काढलं तर बरं होईल, प्रत्येकालाच आमच्या प्रश्नाविषयी खरच मनापासून कळवळा आहे, पण notification काढलं तर बरं होईल, इथे चांगले चांगले मोठे मोठे लोक खूप काही चांगलं चांगलं बोलून गेले, पण notification काढलं तर बरं होईल, Meeting आपण मागच्या महिन्यात सुद्द्धा घेतलीत, cabinet ने निर्णय सुद्धा घेतला आहे, आता notification काढलं तर बरं होईल. आमचं काय ओ साहेब , आमच्या समोर आज हा leader उभा आहे , उद्या दुसरा कुणीतरी येवून उभा राहील आणि परवा तिसरा कुणीतरी येवून उभा राहील, आमच्यासाठी सगळ्यांनाच मनापासून कळवळा आहे पण तेवढं notification काढलं तर बरं होईल... सुदर्शन जायभाय 

Mysterious Life and Support system

Image
 Life is a mystery. जीवन हे एक रहस्य आहे.. तुमच्या आयुष्यात कोणत्याही क्षणी काहीही होवू शकत... चांगले दिवस असतील वाईट दिवस असतील...खूप चांगले क्षण असतील, आणि खूप खूप वाईट phases पण असतील. तुमच्या life वर हजारो रंगांची उधळण केलेली आहे.. कधीही कोणताही रंग तुमच्यासमोर कसा प्रगट होईल, हे कुणीच सांगू शकत नाही... खरच life ही एक mystery आहे, एक रहस्य आहे.... तुमच्या life कडे कधीतरी एका broad view ने बघायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला पण कळेल की तुम्ही आता पर्यंत जे काही 20-25-30-35 वर्ष जगला आहात, त्या कडे जर तुम्ही बघितलं तर अस जाणवेल की कसले कसले प्रसंग तुम्ही पचवले आहेत,भोगले आहेत, सोसले आहेत...चांगलं वाईट सगळच बघितलं आणि अजून बघाल पुढे पण... एवढं सगळं मी आज का व्यक्त होतोय तर मला माझा इथे एक perspective मांडायचा आहे की life हे एक रहस्य आहे, समजण्यापलीकडे आहे...आपल्याला हे life भेटल आहे, ह्याला रहस्या सारखच treat करूयात, respect करूयात....कसल्याही गोष्टीचा ताण येत असेल , नको नको होत असेल तर त्याच एवढं मनावर घेवू नका (मग ते काहीही असो) .. तुम्ही 25-30 वर्ष जगलात , अजून 25-30 वर्ष जगाल आण...

आपण नशीबवान आहोत

आयुष्य जस असेल तस accept करून ते सुंदर करण्यावर आपण भर द्यायला पाहिजे. मनाला नको असलेल्या गोष्टी होतच राहतील आयुष्यात, कूनाचच आयुष्य perfect नाहीये, कुणाच्याच आयुष्यात 100% मनासारखं झालेल नाहीये, वाटल्यास आपल्या आजूबाजूला विचारा कुणाला पण. कारण आपल्या मनाला निसत काही ना काही हवं असतं, आपल्या इच्छा endless आहेत...तुम्हाला आत्ता bike हवी असेल आणि ती मिळाली तर तुम्हाला चार चाकी हवी असते, ती मिळाली की तुम्हाला त्यातली भारी वाली महागडी गाडी हवी असते...आपल्या इच्छा आकांक्षाना मरण नाही, त्या सतत आपल्याला, आपल्या हृदयाला ,आपल्या मनाला जाळत असतात, आणि आपण त्यात नकळत जळत असतो...मला जेव्हा अशा इच्छा अस्वस्थ करून सोडतात तेव्हा मी पुण्यात झेड ब्रिज खाली राहत असलेल्या लोकांकडे जावून त्यांना एकटक बघत बसतो आणि विचार करतो की त्यांच्या life मध्ये किती गोष्टी कमी आहेत, आणि मला तर देवाने इतकं भरभरून दिलंय तरी मी असा का जळतोय या इच्छांपायी..थोड मन शांत होत तेव्हा... कधी कधी अस वाटू शकत की डोक्याचं दही होत चाललंय, कळत नाही कुणाशी कस वागायचं, कस बोलायचं , अस वाटत की आपण वेडे आहोत किंवा मानसिक रोगी तर नाही, त...

Girls aspirants जन्मा तुमची कहाणी..(By Punam Ahire)

  कधी नव्हे ते परीक्षा केंद्रावर निवांत वाटतं होतं ,त्यामुळे आजूबाजूच्या जगाचे जरा भान होते आज (बहुधा जागा जास्तच वाढल्याने असावं.) सालाबादाप्रमाणे exam hallमध्ये घुसेपर्यंत वाचायची सवय म्हणून विज्ञानाच्या micronotes घेऊन  exam centre च्या बाहेर वाचत बसलेली.. प्रसंग1- उजव्या हाताला एक चाळीशी-पन्नाशीतील एक काकू येऊन बसल्या, त्यांची मुलगी exam centre मध्ये गेलेली,सगळे candidate मध्ये जात होते पण मी काही हलेना म्हणून मला म्हटल्या," तुझी नाही का परीक्षा?" मी म्हटलं आहे ना काकू, पण मला उशीरा आत जायला आवडतं ,जेणेकरून जास्तवेळ बसावं लागतं नाही ताटकळतं, त्या म्हटल्या मी वणीहून आलीय मुलीसोबत..मला मनोमन कौतुक वाटलं  कारण एकंदरीत भाषा व राहणीमान यावरुन  शेतकरी  वाटतं होत्या अन् शेतकरी महिलांना घरातच अन् शेतात पुष्कळ काम असतात तरी त्या काकूंनी मुलीच्या परीक्षेला प्राधान्य दिलं अन् तिला परीक्षेसाठी प्रवासात सोबत अन् मानसिक आधार द्यावा म्हणून त्यांनी सुट्टीही घेतली..आज काल WFH वाले तर सगळीकडे laptop घेऊन दिसत असताना त्या आईचं मुलींच्या परीक्षेला प्राधान्य देणं मनाला खुप भावून...

"तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना"

 काही अनुभव  ह्रदयावर कोरून ठेवायचे असतात..त्यातलाच हा एक..(थोडा त्रासदायक होता म्हणून परीक्षेनंतर लिहितेय) 21 मार्च 2021चा दिवस  होता. यथावकाश म्हणत म्हणत  एक्झाम तब्बल वर्षभर उशिरा होत होती.. High alert मध्ये पेपरला निघालेली मी.. सगळं लक्ष त्या  चार तासांवर होतं. पहिला पेपर झाला , थोडा वेगळाच होता पेपर पण पुढच्या पेपर वर भिस्त ठेवून स्वतःचे अवसान सांभाळत होती..csat च्या पेपर जाताना हळूच ती मागून अन् विचारलं , "ऐ तू दिशा आहेस ना ?" मी चरकलेच  एवढ csat alert अन् मास्क असताना कोण मला ओळखत इथवर  आलं..पाहिल तर ती पंजाबी ड्रेस घातलेली , गळ्यात मंगळसुत्र असलेली एक  मुलगी...माझी  अगदी लहानपणीची  वर्गमैत्रीण "मधू".. बालपणी म्हणजे अगदी तिसरी चौथीला एका वर्गात असू बहुधा अन् शाळेत पहिल्या दोन तीन क्रमांक राहायचो आम्ही त्यामुळे  खास ओळख..नंतर शाळा बदलल्या शहरं बदलली , तब्बल 16-17 वर्षानी तेही mpsc centre वर भेट  ...म्हणे," अगं मी तुला सकाळीच पाहिलं  पण तुझं लक्ष नव्हतं"..अगदी जुजबी बोलून  आम्ही परीक्षेला पळालो............. ह्यान...

प्रवास

 Journey has to be completed.  प्रवास पूर्ण कराच. प्रवास हा पूर्ण करावाच लागतो. या प्रवासात काही मनासारखं होईल, काही मनाविरुद्ध होईल.  कुणी भेटेल, कुणी सोडून जाईल. भेटण्याचा आनंद मिळेल आणि विरहाचे दुःख सुद्धा या प्रवासात मिळेल. आणि  प्रत्येकाला मिळणारच . कुणाला ते आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात , कुणाला मध्येच तर कुणाला शेवटी शेवटी.. पण प्रवास तर पूर्ण करावाच लागणार. Journey has to be completed. अधिकारी व्हाल किंवा नाही व्हाल , होण्याने किंवा नाही होण्याने खूप काही मोठा फरक पडणार नाही. हजारोनी अधिकारी होत असतात. मग त्यात आपण अधिकारी होण्याने काय मोठा फरक पडणार आहे. आपण अधिकारी होवून काय करून दाखवणार आहोत, खरंच काही करणार आहोत की फक्त बोलबच्चनच देणार आहोत.   आपल्या कामातून, आपलं काम बघून किती जणांना प्रेरणा मिळणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे.. फक्त अधिकारी होवून आणि काम सुरू करण्याआधीच भाषण ठोकून, मोठे मोठे लेख लिहून तुम्ही नवीन मुलांना inspire नाही करत तर त्यांचं नुकसान करत आहात , त्यांचं career spoil करत आहात.. कसही असो, हा प्रवास कधी कधी तुम्हाला अपयशाक...

या ह्रिदयीचे त्या हृदयी

 तू तुझ्या समजुतीने अर्थ काढशील माझ्या शब्दांचे मी लिहित राहील माझ्या कुवती प्रमाणे माझे शब्द त्या दोन शब्दामध्ये भेटेल तुला काहीतरी  जे भेटलं नसेल कुणालाच कुठे सापडलं तुला ते तर नक्की कळव मला मी इथेच आहे शब्द तर साधन आहेत शब्द एक आधार आहेत शब्द कुबड्या आहेत काहीतरी मला पोचवायच असतं तुझ्यापर्यंत पण तुझ्या समजुतीने तू समजुन घेतोस/घेतेस दुसरच काहीतरी या हृदयीचे त्या हृदयी घालणं पण होत असतं अधून मधून पण कमी वेळा बहुतेकदा माझ्या कुवतीने लिहिलेलं तुला समजत दुसऱ्याच अर्थाने तुझ्या समजुती नुसार.. शब्दांच जंगलच हे अडकलोय यात मी आणि तू पण शब्द नावाला नुसते खर जे आहे ते काही वेगळंच आहे ते न सांगता ही कळतं असतं, जाणवत असतं त्या खऱ्याला कसल्याच आधाराची गरज नसते कारण ते खर असतं ते पोहचत जिथं पोचायचं तिथे अगदी वेळेवर  काहीतरी हृदयी घालायचा भाबडा प्रयत्न परत केला आहे मी बघ काही भेटतय का तुला त्या दोन शब्दामध्ये तुझ्या समजुती नुसार सापडलं तर नक्की कळव मला मी इथेच आहे भेटलं तर ठीक नाहीतर दे सोडून - सुदर्शन  11.18 pm,  25 August, पुणे