आपण नशीबवान आहोत


आयुष्य जस असेल तस accept करून ते सुंदर करण्यावर आपण भर द्यायला पाहिजे.

मनाला नको असलेल्या गोष्टी होतच राहतील आयुष्यात, कूनाचच आयुष्य perfect नाहीये, कुणाच्याच आयुष्यात 100% मनासारखं झालेल नाहीये, वाटल्यास आपल्या आजूबाजूला विचारा कुणाला पण. कारण आपल्या मनाला निसत काही ना काही हवं असतं, आपल्या इच्छा endless आहेत...तुम्हाला आत्ता bike हवी असेल आणि ती मिळाली तर तुम्हाला चार चाकी हवी असते, ती मिळाली की तुम्हाला त्यातली भारी वाली महागडी गाडी हवी असते...आपल्या इच्छा आकांक्षाना मरण नाही, त्या सतत आपल्याला, आपल्या हृदयाला ,आपल्या मनाला जाळत असतात, आणि आपण त्यात नकळत जळत असतो...मला जेव्हा अशा इच्छा अस्वस्थ करून सोडतात तेव्हा मी पुण्यात झेड ब्रिज खाली राहत असलेल्या लोकांकडे जावून त्यांना एकटक बघत बसतो आणि विचार करतो की त्यांच्या life मध्ये किती गोष्टी कमी आहेत, आणि मला तर देवाने इतकं भरभरून दिलंय तरी मी असा का जळतोय या इच्छांपायी..थोड मन शांत होत तेव्हा...


कधी कधी अस वाटू शकत की डोक्याचं दही होत चाललंय, कळत नाही कुणाशी कस वागायचं, कस बोलायचं , अस वाटत की आपण वेडे आहोत किंवा मानसिक रोगी तर नाही, तेव्हा वेड्यांच्या इस्पितळात just एक चक्कर मारून या, तेव्हा जाणवेल की वेड असणं म्हणजे नक्की काय असतं ..


आपण खूप नशीबवान आहोत, की आपण समाजाचा एक भाग म्हणून काहीतरी ध्येय समोर ठेवून आयुष्य जगत आहोत, struggle करत आहोत. आपल्याला कधी कधी अस वाटू शकतं की देवाने मला कमी दिलंय, चांगलं घर नाही दिलं,चांगल family background नाही दिलं, चांगले मित्र मैत्रिणी नाही दिले, मनासारख्या गोष्टी आयुष्यात घडत नाहीत, अस वाटू शकत, प्रत्येकालाच अस कधी कधी feel होतच आणि सगळं नकोस होतच, जेव्हा जेव्हा अस वाटेल तेव्हा तेव्हा समाजातल्या सगळ्यात खालच्या थराला जावून भेट द्या..तुमचा जन्म तिथे झाला असता तर? आपल्या हातात नाहीच ना आपला जन्म कुठे व्हायचं ते, मी पण विचार केला की माझा जन्म त्या झेड ब्रिज खालच्या एखाद्या झोपडीत झाला असता तर?? 


गांधीजींच्या Talisman मधल्या शेवटच्या माणसाचा थोड्या वेगळ्या perspective ने सुद्धा विचार करून बघितला तर, तुम्ही नक्कीच शांत व्हाल..

आणि तुम्ही शांत झाल्यावर तिथून पुढच्या तुमच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय त्या शेवटच्या माणसाच्या life मध्ये काहीतरी positive change आणेल, ही प्रार्थना करून इथे थांबतो...


- सुदर्शन जायभाय 



Comments

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग

देह हा पेटू दे