Posts

Showing posts from April, 2021

संगीत आणि मनातले विचार (By Ashwini Bhosale)

Image
  स्वर - तालाच्या दुनियेत मानवी मन अगदी सहज रममाण होतं असतं. असा एकही मनुष्य नसेल की त्याला यातलं एकही आवडत नसेल . अगदी सर्वात निरस व्यक्तीला सुद्धा यातला एखादा तरी प्रकार नक्कीच आवडत असेल. प्रत्येक स्वराचे, प्रत्येक तालाचे त्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे, त्याला स्वतःचे एक अस्तित्व आहे . तालाचे योग्य मिश्रण हे उत्तम संगीत बनू शकते तर स्वरांचे योग्य मिश्रण एक गाणं बनवू शकते. या तालाची गंमत म्हणजे यांची गुंफण योग्य होण.... एखादा ताल वेगळा आला तर कदाचित संगीताची लय बदलू शकते आणि कदाचित ते अगदी अश्रवणीय ठरू शकते किंवा कदाचित ते उत्तम आश्चर्य असलेले सुद्धा होऊ शकते.  मग याची खातरजमा तुम्हाला स्वर तालाची प्रॅक्टिस करतानाच करावी लागते. तसेच डोक्यातील विचारांचे असते जसे संगीतात अनेक स्वर-ताल आहेत, तसेच डोक्यात अनेक विचार आहेत.. दररोजच्या जीवनात एक विचारमाला सतत सुरू असते.  त्यात अनेक विचार येत असतात पण कुठला विचार हा विचारमालेत ठेवून जीवनाचे संगीत उत्तम करायचे हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे ... विचार अनेक येतील  पण असेच विचार निवडावे लागतील ज्यांची विचार शृंखला उद्याच्या उज्ज...

How many deaths will it take 'till he knows That too many people have died?

Image
  How many deaths will it take 'till he knows That too many people have died? प्रेमात सुंदर क्षण बोलतात डोळे झाकता हे क्षण उमलतात माझे नाही तुझे असे सांगता त हे सुदंर क्षण अर्थ उमगतो कधी तुझ्या नसण्याचा कधी तुझ्या असण्याचा सर येते पावसाची कधी उन्हाळ्यात सावलीची झाडाखाली बस आणि हे सुंदर क्षण बघ थांबूनी सुंदर च हे सगळं पण डोळे नसतात स्तब्ध ते पाहण्याकरता दिसत नाही म्हणून हे सगळं थांबलेलं सगळं थांबलेलं च असतं थांबलेली माणसं, थांबलेली झाड, आणि थांबलेलं मन पण आपणच पळतो पळतो हातच सोडून सैरभैर.. थोड स्थिरावलो तर कदाचित दिसेल अखंड शांतता थोड स्थिरावलो तर होईल खऱ्या सुंदरतेचे दर्शन थोड थांबलो तर विसावेल थोड थांबलो तर अर्थ समजेल थोड थांबलो तर थांबून कदाचित ऐकू येतील बोल अंतरीचे थांबतो थोड स्थिरावतो थोड  _ सुदर्शन जायभाय

ते झोके हिंदोळे

Image
  ते झोके हिंदोळे कोकेन चे डोहाळे  पळतो पळतो मागे मागे ती गवताची पाती फिक्कट हिरवट त्या बाजूची चुंबकाची जादू आणि दोन रुपयाची टॉफी खर्ची आंबट चिंचेची बात चेंडू फळी हातात घोट घोट संपता सुकली पाने झुरक्यात सुगीचे ते बालपण  मातीचे तेच कण कोरड्या नद्या आणि वाळवंटी तरुणपण ह्या सगळ्यांचा एक पिटारा सोडत वाटेत एक सारा परत एकदा भरून वाहू दे ती नदी एक वारी - निखील लाड (+91 70576 20470)

वाऱ्यातच सगळी उत्तरे

Image
 शब्द असतीलही कधी सोबत, कधी नसतीलही कदाचित.. शब्दांची सोबत नसतानाही समजाव्या लागतील खूपशा गोष्टी.. गोष्टी सगळ्या कशा बांधणार शब्दात,ओळीत,वाक्यात... त्या तर पसरत असतात इथून तिथे, वाऱ्यासारख्या चपळ.. मी काय लिहिणार त्यांना , त्याच रेघोट्या मारत असतात माझ्यावर सतत ... शब्दांच्या कुबड्या घ्यायला पाहतोय आजकल.. पण अपुऱ्या पडतात... शब्दच ते माणसाने बनवलेले... खोल विहिरीत डोकावून पहावं, आतला दाट अंधार बोलावतो तसे हे भाव शब्दात उतरायला पाहत असतात.. खूपदा टाळलं, पण एकट्यात असे धाडकन समोर येवून उभे राहतात.. म्हणतात लिही आम्हाला.. मग लिहितो.... एखादी दारूची अख्खी बाटली संपवत आहे , नशा करत आहे , तस अख्खं आयुष्य  एका भयानक धुंदीत चाललं आहे... ही धुंदच सत्य आहे की ह्या धुंदीच्या पलीकडे पण काही आहे का?  हे पण धुंदीत असल्याने समजत नाही... आल life आणि गेलं life.... कुठेय मी ? का मी नाहीच... ४० वर्ष, ३० वर्ष, ६० की ८० वर्ष.... संपतात डोळ्याची पापणी लवता लवता.... पहाताच राहायचं ..... माणसं, रस्ते, देखावे, अनुभव, सुंदरता , कुरूपता, सृष्टी... पाहत रहायच हे ...हे दाखवत राहतात जे.... कितीतरी जना...

एकच रंग ??

  तुझ्या आयुष्याला दुसरे पदर ही आहेतच की, बघ की जरा ते पण... एकच रंग का पांघरून घेतला आहेस तू ? दुसरे रंग कुठे आहेत, ते पहायचेच नाहीयेत का तुला ? पलीकडे पण बरच पाणी वाहत आहे, बुडावस वाटत नाही का त्या झऱ्यात तुला ? थंडगार पाणी, मन थंड करनार , डोक्याचा बर्फ करणार पाणी.. आज लिहिता झालास , लिहीत रहा.. काहीतरी चुकणारच , आपल्याला कुठ सगळं येतंय... व्यक्त व्हायला बघत असतो प्रत्येक जीव या ना त्या मार्गाने.. साचलेल बाहेर येत असत, शब्द शब्द आणि शब्द.... व्यक्त होण्याचं कौशल्य कदाचित हळू हळू सुधारेल किंवा नाहीही... पण लिहिलं तर पाहिजे .. अर्थ निघतील बरेच माझ्या म्हणण्याचे किंवा निरर्थकही वाटू शकत सगळं.. Sensitive की sensless ?? - Sudarshan

I see nothing

  This is not life. This is different. This doesn't make sense. What is this. Is this what we grow for? I see nothing. I understand nothing now. Is it a black. Does light vanished permanently. Everything seems nothing now. Everything feels like silenced down. Can there be light again? Can i became interested again? Can u think in such a way? Can you permit me  to think,to do . Can i live, breathe. Can i fly or go invisible for sometime. Can you make some sense . Can't you understand. I see nothing now, i feel nothing now. - Sudarshan

This is it

  This is it What i see , it is. It is as it is. As it is is. What u call it, a pain. Uncomfortable i am. Unbearable it is. Using words to put it. But no exact words to describe it. It is as it is , unbearable, uncomfortable. Not clear thoughts, all blurred. How u feel this pain. How u go through it. Its a luxurious to experience such thing. Luxurious pain, u can call it. U take pleasure to feel it. Sensitive or senseless?? -Sudarshan

पहिला ब्लॉग

Image
सुटायचय .........   तिने तिथेच सोडून दिलं सगळं, आहे तस..... वेळही नव्हती अस सर्व मधून सोडून जायची.. पण तिला ते सोडायचं होत, तिन सोडलं, आणि झाली मोकळी... श्वास घेतला मोकळा तिने...तिला हलकं वाटलं ...पुढचा प्रवास हलका हलकासा वाटत होता तिला... जड झाल होत बरच, म्हणून तिने सर्व सोडलं मध्येच... आता काय तर चालत राहायचं, रस्ता आहे म्हटल्यावर चालायचं.. कुठेही जा , वाटा तर असणारच, आपलं काम चालायच, चालत राहायचं.. थकलीस ग बाई तू खूप , पण तुला चालणं भाग आहे.. कधी ती व्यक्त झाली, कधी अव्यक्त राहिली.. जग तिच्याकडं पहायचं फक्त , त्या अव्यक्तपणाला समजून घ्यावं असं कधी वाटलं का कुणाला... तिला बऱ्याचदा म्हणायचं होत खूप काही , पण ती नाही म्हणाली..her eyes spoke instead, but very few understood it... बहुतेक अशा अव्यक्त होण्यातच तिला तीच 'स्त्रीत्व' जपण्याच समाधान वाटत असावं..... खूप वेळा वाटलं होत तिला की सुटाव... आज ती सुटली, तिला बर वाटलं, मोकळं वाटलं.. आता पुढं पण वाट दिसत आहे , ती चालायची.... - Sudarshan Jaybhay