देह हा पेटू दे
देह हा पेटू दे हा देह कधीही निसटू शकतो, ह्याचा काहीच नेम नाही , ह्याचा काहीच नेम नाही . हा देह कधीही असह्य यातना देवून आपल चालण बोलणं बंद करू शकतो, नियतीने ह्या देहाला मोजून श्वास दिले आहेत. कुणी कमी वर्ष जगत, कुणी जास्त. कुणी आरोग्यदायी जीवन जगत, तर कुणी असह्य वेदनेचं एका जागी बसून. इथून पुढचे ह्या देहातले उरले सुरलेले श्वास चांगल्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करायला हवा, आपण कधी मरणारच नाही , अशा भ्रमात आपण जगत असतो , अंदाजे ७०/८०/९० वर्ष तरी जगू, अशाही भ्रमात आपण जगत असतो. कोण कधी ह्या जगाचा निरोप घेईल , कुणीच सांगू शकत नाही . एखादा धड धाकट देह तरुणपणातच कुणाची तरी सुट्टी करतो, आणि एखादा ऐंशी नव्वदीतला झिजलेला देह देवाकडे मरणाची प्रार्थना करत असतो काही देहांना लहानपणी तरुणपणीच भयंकर आजार आपल्या कवेत घेतात, तर काही देहांतून एखादा अवयव कायमचा निरोप घेतो. तुझ्या माझ्या ओळखीतल कुणीतरी काल परवा खूप असह्य अशा आजारातून वेदनेतून जावून आल असेल किंवा अजूनही झुंजत असेल . तुझ्या माझ्या ओळखीतलं कुणीतरी काल परवा काहीतरी क्षुल्लक निमित्...