प्रवास

 Journey has to be completed. 

प्रवास पूर्ण कराच.


प्रवास हा पूर्ण करावाच लागतो. या प्रवासात काही मनासारखं होईल, काही मनाविरुद्ध होईल. 

कुणी भेटेल, कुणी सोडून जाईल. भेटण्याचा आनंद मिळेल आणि विरहाचे दुःख सुद्धा या प्रवासात मिळेल. आणि  प्रत्येकाला मिळणारच . कुणाला ते आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात , कुणाला मध्येच तर कुणाला शेवटी शेवटी.. पण प्रवास तर पूर्ण करावाच लागणार. Journey has to be completed.

अधिकारी व्हाल किंवा नाही व्हाल , होण्याने किंवा नाही होण्याने खूप काही मोठा फरक पडणार नाही. हजारोनी अधिकारी होत असतात. मग त्यात आपण अधिकारी होण्याने काय मोठा फरक पडणार आहे. आपण अधिकारी होवून काय करून दाखवणार आहोत, खरंच काही करणार आहोत की फक्त बोलबच्चनच देणार आहोत.  

आपल्या कामातून, आपलं काम बघून किती जणांना प्रेरणा मिळणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे..

फक्त अधिकारी होवून आणि काम सुरू करण्याआधीच भाषण ठोकून, मोठे मोठे लेख लिहून तुम्ही नवीन मुलांना inspire नाही करत तर त्यांचं नुकसान करत आहात , त्यांचं career spoil करत आहात..


कसही असो, हा प्रवास कधी कधी तुम्हाला अपयशाकडे घेवून चालला आहे अस वाटू शकत. पण अस काही नसतं. पुढे कोणत्या क्षणाला काय होईल हे काहीच सांगू शकत नाही.. फक्त आपल्या कामावर विश्वास ठेवून ते सतत improve करावं. स्वतःला जमेल तितक flexible ठेवावं. " मी असाच आहे, मला फक्त हेच जमत, मी फक्त हेच करू शकतो" हे सगळं डोक्यातून काढून टाका...


मला काहीही जमू शकतं. हा मंत्र जपायला हवा..वेळ कशी कधी येईल ते सांगू शकत नाही. आपण आपल्या side ने flexible राहीलच पाहिजे..आणि post covid जग हे फक्त flexible लोकच चालवू शकणार आहेत..

आपण Specific क्षेत्राला किंवा specific गोष्टींना विनाकारण महत्व देवून त्यांना अवास्तव मोठ स्वरूप दिलं आहे. Covid ने ते सगळं उध्वस्त केलं आहे.


प्रवास हा असाच आहे . तुम्हाला आता जे महत्वाचं वाटतंय ते ५_१० वर्षांनी शुल्लक वाटेल.

प्रवासात महत्वाचं हेच आहे की , आपण इतरांच्या किती कामी येतोय. दुःख तर भरभरून असणार आणि ते face करावच लागणार.  पण ते आपल्या घेण्यावर आहे आपण ते कस घेतो..


दुःख पर्वता एवढं असणारच आहे. करोडो अब्जो नी लोक या जगात येवून गेले. त्यांनी सुद्धा हे पर्वता एवढं दुःख भोगलच की..कुणी हसत हसत तर कुणी रडत रडत. पण भोगावं तर लागतच..कुणालाच सुट्टी नाही. अगदी Pm, Cm असो की गरीब दोन वेळच्या जेवणाचे वांदे असणारा मजूर असो. 

दुःख दुख दुःख . .माणूस सुखाशी मैत्री करून दुःखाला दूर सारण्याचा अयशस्वी प्रयत्न सतत करत आला आहे. त्या साठी त्याने जमेल त्या गोष्टीचा आधार घेतला. विज्ञान तंत्र ज्ञान असो , ध्यान धारणा योग असो, सिध्द पुरुषाचा सहवास असो, स्वतःला कामात गुंतवून ठेवन असो. 

हे इतकं काय काय केलं माणसाने तरी सुद्धा दुःख काय कमी झालं नाही...उलट ते वाढत गेलं..वाढत चाललं आहे...


मानवी जीवनाच्या प्रवासाला दुसरं नाव दुःखच आहे...आपण कितीही positive thinking च्या गप्पा केल्या, optimism वर लेख लिहिले तरी पण दुःख तुम्हाला सुटणार नाही..कधी कधी ते सहन करण्यासारखं असेल . ते सहन होईल, पण मग ते दुखं नसेल , तो फक्त एक अनुभव असेल . 

माझ्या मते "दुःख म्हणजे जे सहन च करता येत नाही" आपण फक्त ते face करत असतो साक्षीभावाने , आपल्या हातात ते face करण्यापलीकडे काहीच नसत. आणि जेव्हा ती phase निघून जाते तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटत की " एवढं सर्व मी कस काय सहन केलं बुआ" ..हे आहे खर दुःख...आणि याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला येतच असतो...समोरचा मनुष्य वरून कितीही चांगला, टापटीप , व्यवस्थित दिसत असला तरी त्याचं दुःख तितकच निर्दयी,त्रासदायक आणि असह्य असू शकतं , हे आपण नाकारू शकत नाही..

हा प्रवास आहे , प्रवास तर पूर्ण करावाच लागणार . नाव पैलतिरी न्यावीच लागणार.. कधी energetic असाल , कधी energy down असेल तर कधी इतके हतबल असाल की कोणताही ch**** येवून  तुम्हाला उपदेशाचे dose पाजेल( अशावेळी शांत चित्ताने ऐकून घ्यायचं)..पण प्रवास तर पूर्ण करायचाच..अर्ध्यावर सोडायचाच नाही. वेळ कधी आपल्या हातात असते , कधी दुसऱ्याच्या तर कधी कुणाच्याच नाही.

दुःखाशी जर मैत्री केली , दुःखावर जर आपण प्रेम करायला शिकलो तर आपला प्रवास थोडातरी सुसह्य होण्यास मदत होईल. पण त्याला जितकं दूर लोटू ते तितकं जास्त ताकदीने येवून आपल्याला भिडत असतं. त्याला येवू द्यायचं , दोन्ही हाताने त्याच स्वागत करायचं. कदाचित अस केल्याने तुमचा त्रास कमी होईल . करून बघा. आणि कळवा..


आपला प्रवास सुखाचा होवो..


_ सुदर्शन , 3 ऑगस्ट 2021


Comments

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग

देह हा पेटू दे

आपण नशीबवान आहोत