Girls aspirants जन्मा तुमची कहाणी..(By Punam Ahire)
कधी नव्हे ते परीक्षा केंद्रावर निवांत वाटतं होतं ,त्यामुळे आजूबाजूच्या जगाचे जरा भान होते आज (बहुधा जागा जास्तच वाढल्याने असावं.) सालाबादाप्रमाणे exam hallमध्ये घुसेपर्यंत वाचायची सवय म्हणून विज्ञानाच्या micronotes घेऊन exam centre च्या बाहेर वाचत बसलेली.. प्रसंग1- उजव्या हाताला एक चाळीशी-पन्नाशीतील एक काकू येऊन बसल्या, त्यांची मुलगी exam centre मध्ये गेलेली,सगळे candidate मध्ये जात होते पण मी काही हलेना म्हणून मला म्हटल्या," तुझी नाही का परीक्षा?" मी म्हटलं आहे ना काकू, पण मला उशीरा आत जायला आवडतं ,जेणेकरून जास्तवेळ बसावं लागतं नाही ताटकळतं, त्या म्हटल्या मी वणीहून आलीय मुलीसोबत..मला मनोमन कौतुक वाटलं कारण एकंदरीत भाषा व राहणीमान यावरुन शेतकरी वाटतं होत्या अन् शेतकरी महिलांना घरातच अन् शेतात पुष्कळ काम असतात तरी त्या काकूंनी मुलीच्या परीक्षेला प्राधान्य दिलं अन् तिला परीक्षेसाठी प्रवासात सोबत अन् मानसिक आधार द्यावा म्हणून त्यांनी सुट्टीही घेतली..आज काल WFH वाले तर सगळीकडे laptop घेऊन दिसत असताना त्या आईचं मुलींच्या परीक्षेला प्राधान्य देणं मनाला खुप भावून...