प्रवास
Journey has to be completed. प्रवास पूर्ण कराच. प्रवास हा पूर्ण करावाच लागतो. या प्रवासात काही मनासारखं होईल, काही मनाविरुद्ध होईल. कुणी भेटेल, कुणी सोडून जाईल. भेटण्याचा आनंद मिळेल आणि विरहाचे दुःख सुद्धा या प्रवासात मिळेल. आणि प्रत्येकाला मिळणारच . कुणाला ते आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात , कुणाला मध्येच तर कुणाला शेवटी शेवटी.. पण प्रवास तर पूर्ण करावाच लागणार. Journey has to be completed. अधिकारी व्हाल किंवा नाही व्हाल , होण्याने किंवा नाही होण्याने खूप काही मोठा फरक पडणार नाही. हजारोनी अधिकारी होत असतात. मग त्यात आपण अधिकारी होण्याने काय मोठा फरक पडणार आहे. आपण अधिकारी होवून काय करून दाखवणार आहोत, खरंच काही करणार आहोत की फक्त बोलबच्चनच देणार आहोत. आपल्या कामातून, आपलं काम बघून किती जणांना प्रेरणा मिळणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे.. फक्त अधिकारी होवून आणि काम सुरू करण्याआधीच भाषण ठोकून, मोठे मोठे लेख लिहून तुम्ही नवीन मुलांना inspire नाही करत तर त्यांचं नुकसान करत आहात , त्यांचं career spoil करत आहात.. कसही असो, हा प्रवास कधी कधी तुम्हाला अपयशाक...