या ह्रिदयीचे त्या हृदयी

 तू तुझ्या समजुतीने अर्थ काढशील माझ्या शब्दांचे

मी लिहित राहील माझ्या कुवती प्रमाणे माझे शब्द


त्या दोन शब्दामध्ये भेटेल तुला काहीतरी 

जे भेटलं नसेल कुणालाच कुठे

सापडलं तुला ते तर नक्की कळव मला

मी इथेच आहे


शब्द तर साधन आहेत

शब्द एक आधार आहेत

शब्द कुबड्या आहेत

काहीतरी मला पोचवायच असतं तुझ्यापर्यंत

पण तुझ्या समजुतीने तू समजुन घेतोस/घेतेस दुसरच काहीतरी


या हृदयीचे त्या हृदयी घालणं पण होत असतं अधून मधून पण कमी वेळा

बहुतेकदा माझ्या कुवतीने लिहिलेलं तुला समजत दुसऱ्याच अर्थाने तुझ्या समजुती नुसार..


शब्दांच जंगलच हे

अडकलोय यात मी आणि तू पण

शब्द नावाला नुसते

खर जे आहे ते काही वेगळंच आहे

ते न सांगता ही कळतं असतं, जाणवत असतं


त्या खऱ्याला कसल्याच आधाराची गरज नसते

कारण ते खर असतं

ते पोहचत जिथं पोचायचं तिथे

अगदी वेळेवर 


काहीतरी हृदयी घालायचा भाबडा प्रयत्न परत केला आहे मी

बघ काही भेटतय का तुला त्या दोन शब्दामध्ये तुझ्या समजुती नुसार

सापडलं तर नक्की कळव मला

मी इथेच आहे


भेटलं तर ठीक नाहीतर दे सोडून


- सुदर्शन 

11.18 pm,  25 August, पुणे

Comments

  1. भेटेल नक्की
    अगदी शब्दामध्ये पण
    आणि निशब्द पण !
    तू बघ जाणवतंय का ते
    ज्याला ना शब्दाची गरज
    ना अर्थाची...
    जे सत्य आहे
    आणि अव्यक्त ही!
    ते कळलं की,
    सगळं आपसूक भेटेल
    न शोधता��

    ReplyDelete
  2. Pohochale aselahi pan kalun ghayche nastil tuzhe sabdha

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग

देह हा पेटू दे

आपण नशीबवान आहोत