भर 20 लाख आणि चिकटून जा एकदाचा...
किती रेट चालू आहे?
कमीत कमी 20 लाख
मग अभ्यास करावा की 20 लाख भरून नोकरी मिळवू.
नसेल काही फरक पडत तुझ्या मनाला तर भर 20 लाख आणि घे नोकरी
अस किती दिवस अजून struggle करणार,mess च खाणार, अभ्यासिकेची fees भरणार, महिना अखेर ला मित्रांना पैसे मागणार.
भर 20 लाख आणि घे नोकरी.
नोकरी मिळाल्यावर महिन्याला कमीत कमी एक दीड लाख तरी वर कमाई होईलच की, मग लाव हिशोब , वर्षाचे किती..
भर की मग 20 लाख, माझ्या कानावर जसा हा आकडा आला तसा तुझ्या पण कानावर आलाच असेल की, काहीतरी पत्ता सापडेलच दलालांचा. शोध मग. जीवघेण्या स्पर्धेतून अभ्यास करून post काढणं अवघड आहे, त्यापेक्षा 20 लाख जमवून ही पोस्ट मिळवणं सोप्प आहे..
भर 20 लाख. आणि पैसे बुडणार नाही. Sure shot guarantee आहे, post मिळणारच आहे. बघ newspaper मध्ये सुद्धा रोज येत आहेत असल्या बातम्या.. म्हणजे आपली बाजू मजबूत आहे..
तुला पण माहीत आहे , मला पण माहीत आहे, ह्या बातम्या newspaper मध्ये येतील जातील, सरकार काहीतरी statement देईल, आश्वासन देईल, पण असल परत परत कानावर पडतच राहणार, दर वर्षी हे असल काहीतरी कानावर पडतच राहील, मग भरूनच टाकू ह्या वर्षी हे 20 लाख, कुठेतरी चिकटून तरी जावू एकदाच...
-Sudarshan Jaybhay



Comments
Post a Comment