Notification काढल तर बरं होईल
साहेब आमच्या मुद्द्याच राजकारण करण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल, साहेब आम्हाला Meeting च आश्वासन देण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल, काहीच नाही मागितलं , फक्त अभ्यासासाठी थोडा वेळ मागितला आहे, त्यामुळे notification काढलं तर बरं होईल, प्रत्येकालाच आमच्या प्रश्नाविषयी खरच मनापासून कळवळा आहे, पण notification काढलं तर बरं होईल, इथे चांगले चांगले मोठे मोठे लोक खूप काही चांगलं चांगलं बोलून गेले, पण notification काढलं तर बरं होईल, Meeting आपण मागच्या महिन्यात सुद्द्धा घेतलीत, cabinet ने निर्णय सुद्धा घेतला आहे, आता notification काढलं तर बरं होईल. आमचं काय ओ साहेब , आमच्या समोर आज हा leader उभा आहे , उद्या दुसरा कुणीतरी येवून उभा राहील आणि परवा तिसरा कुणीतरी येवून उभा राहील, आमच्यासाठी सगळ्यांनाच मनापासून कळवळा आहे पण तेवढं notification काढलं तर बरं होईल... सुदर्शन जायभाय