देह हा पेटू दे

 देह हा पेटू दे 


हा देह कधीही निसटू शकतो,

ह्याचा काहीच नेम नाही , ह्याचा काहीच नेम नाही .


हा देह कधीही असह्य यातना देवून आपल चालण बोलणं बंद करू शकतो,

नियतीने ह्या देहाला मोजून श्वास दिले आहेत.

कुणी कमी वर्ष जगत, कुणी जास्त. कुणी आरोग्यदायी जीवन जगत, तर कुणी असह्य वेदनेचं एका जागी बसून.


इथून पुढचे ह्या देहातले उरले सुरलेले श्वास चांगल्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करायला हवा, 

आपण कधी मरणारच नाही , अशा भ्रमात आपण जगत असतो ,

अंदाजे ७०/८०/९० वर्ष  तरी जगू, अशाही भ्रमात आपण जगत असतो.


कोण कधी ह्या जगाचा निरोप घेईल , कुणीच सांगू शकत नाही .

एखादा धड धाकट देह तरुणपणातच कुणाची तरी सुट्टी करतो, 

आणि एखादा ऐंशी नव्वदीतला  झिजलेला देह देवाकडे मरणाची प्रार्थना करत असतो


काही देहांना लहानपणी तरुणपणीच भयंकर आजार आपल्या कवेत घेतात,

तर काही देहांतून एखादा अवयव कायमचा निरोप घेतो.


तुझ्या माझ्या ओळखीतल कुणीतरी काल परवा खूप असह्य अशा आजारातून वेदनेतून जावून आल असेल किंवा अजूनही झुंजत असेल . 

तुझ्या माझ्या ओळखीतलं कुणीतरी काल परवा काहीतरी क्षुल्लक निमित्त होवून हा देह मातीत मिळवून गेल असेल.

त्या सगळ्यांसाठी आपण नेहमीच प्रार्थना करायला हवी.


मग तू आणि मी , तो आणि ती, हा देह सोडून जाण्याआधी जास्तीत जास्त चांगली काम करुनच जावूयात.

ह्या साडेतीन फुटाच्या कायेला काही अर्थ द्यायला हवा, ही फक्त आणि फक्त चांगल्या कामांसाठीच झिजवायला हवी.

ही भाड्याची खोली , आपण भाडेकरू. आज आहोत, उद्या नसूच. मातीत मिळेल हे . 


मी लिहिलेल तू एवढं मनापासून वाचलस त्याबद्दल तुझे धन्यवाद,


कळव,

@SudarshanJaybhay

8652778011

Comments

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग

आपण नशीबवान आहोत