Posts

प्रवास

 Journey has to be completed.  प्रवास पूर्ण कराच. प्रवास हा पूर्ण करावाच लागतो. या प्रवासात काही मनासारखं होईल, काही मनाविरुद्ध होईल.  कुणी भेटेल, कुणी सोडून जाईल. भेटण्याचा आनंद मिळेल आणि विरहाचे दुःख सुद्धा या प्रवासात मिळेल. आणि  प्रत्येकाला मिळणारच . कुणाला ते आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात , कुणाला मध्येच तर कुणाला शेवटी शेवटी.. पण प्रवास तर पूर्ण करावाच लागणार. Journey has to be completed. अधिकारी व्हाल किंवा नाही व्हाल , होण्याने किंवा नाही होण्याने खूप काही मोठा फरक पडणार नाही. हजारोनी अधिकारी होत असतात. मग त्यात आपण अधिकारी होण्याने काय मोठा फरक पडणार आहे. आपण अधिकारी होवून काय करून दाखवणार आहोत, खरंच काही करणार आहोत की फक्त बोलबच्चनच देणार आहोत.   आपल्या कामातून, आपलं काम बघून किती जणांना प्रेरणा मिळणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे.. फक्त अधिकारी होवून आणि काम सुरू करण्याआधीच भाषण ठोकून, मोठे मोठे लेख लिहून तुम्ही नवीन मुलांना inspire नाही करत तर त्यांचं नुकसान करत आहात , त्यांचं career spoil करत आहात.. कसही असो, हा प्रवास कधी कधी तुम्हाला अपयशाक...

या ह्रिदयीचे त्या हृदयी

 तू तुझ्या समजुतीने अर्थ काढशील माझ्या शब्दांचे मी लिहित राहील माझ्या कुवती प्रमाणे माझे शब्द त्या दोन शब्दामध्ये भेटेल तुला काहीतरी  जे भेटलं नसेल कुणालाच कुठे सापडलं तुला ते तर नक्की कळव मला मी इथेच आहे शब्द तर साधन आहेत शब्द एक आधार आहेत शब्द कुबड्या आहेत काहीतरी मला पोचवायच असतं तुझ्यापर्यंत पण तुझ्या समजुतीने तू समजुन घेतोस/घेतेस दुसरच काहीतरी या हृदयीचे त्या हृदयी घालणं पण होत असतं अधून मधून पण कमी वेळा बहुतेकदा माझ्या कुवतीने लिहिलेलं तुला समजत दुसऱ्याच अर्थाने तुझ्या समजुती नुसार.. शब्दांच जंगलच हे अडकलोय यात मी आणि तू पण शब्द नावाला नुसते खर जे आहे ते काही वेगळंच आहे ते न सांगता ही कळतं असतं, जाणवत असतं त्या खऱ्याला कसल्याच आधाराची गरज नसते कारण ते खर असतं ते पोहचत जिथं पोचायचं तिथे अगदी वेळेवर  काहीतरी हृदयी घालायचा भाबडा प्रयत्न परत केला आहे मी बघ काही भेटतय का तुला त्या दोन शब्दामध्ये तुझ्या समजुती नुसार सापडलं तर नक्की कळव मला मी इथेच आहे भेटलं तर ठीक नाहीतर दे सोडून - सुदर्शन  11.18 pm,  25 August, पुणे

जगण यमुना आजीचं .......

Image
 "हरीच्या मुरलीवर जीव जडे ,    संसार सुख दु:खाचा विसर पडे"  शेताच्या बांधावर झाडाखाली पोत टाकून बसलेली 'यमुना आजी' ही गवळण गुणगुणत होती . श्रवणीय असा आजीचा आवाज एकूण येणारी जाणारी सुद्धा काही काळ रेंगाळून पुढे जात होती . तिच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर जगण्याचा शहाणपणा घेऊन बेताच्या परिस्थितीतही ताठ मानेने जगणारी यमुना आजी ... !. आजीची परिस्थिती सुरुवातीपासूनच जेमतेम होती. त्या काळानुसार तिचे लहान वयात लग्न झाले. नवरा शेतकरी, दोघं कष्टाची भाकर समाधानानं खात. वाट्याला आलेली शेतीही जेमतेम तुकडाभर..! त्यातून शेतीचा कारभार सतत बदलणाऱ्या हवामानामुळे बेजार .....पण दोघांनीही चिकाटीने संसार फुलवला. दुसऱ्याच्या शेतात कधी मजुरी करून, कधी इकड-तिकडची बारीक-सारीक काम करून पै-पै जोडली . शेतीचा बिन भरवशाचा उद्योग ह्या दोघांनी ओळखून साठवलेल्या पै- पै मधून आजोबांनी रस्त्याच्या कडेला एक टपरीवजा हॉटेल टाकण्यासाठी छोटीशी जमीन खरेदी केली. घरात आता खाणारी तोंड वाढली होती . दोन मुले, एक मुलगी ही यमुना आजीच्या संसारवेलीवर आलेली फुल होती. प्रतिकूल परिस्थितीतही दोघं कष्टाने सार सावरत...

संगीत आणि मनातले विचार (By Ashwini Bhosale)

Image
  स्वर - तालाच्या दुनियेत मानवी मन अगदी सहज रममाण होतं असतं. असा एकही मनुष्य नसेल की त्याला यातलं एकही आवडत नसेल . अगदी सर्वात निरस व्यक्तीला सुद्धा यातला एखादा तरी प्रकार नक्कीच आवडत असेल. प्रत्येक स्वराचे, प्रत्येक तालाचे त्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे, त्याला स्वतःचे एक अस्तित्व आहे . तालाचे योग्य मिश्रण हे उत्तम संगीत बनू शकते तर स्वरांचे योग्य मिश्रण एक गाणं बनवू शकते. या तालाची गंमत म्हणजे यांची गुंफण योग्य होण.... एखादा ताल वेगळा आला तर कदाचित संगीताची लय बदलू शकते आणि कदाचित ते अगदी अश्रवणीय ठरू शकते किंवा कदाचित ते उत्तम आश्चर्य असलेले सुद्धा होऊ शकते.  मग याची खातरजमा तुम्हाला स्वर तालाची प्रॅक्टिस करतानाच करावी लागते. तसेच डोक्यातील विचारांचे असते जसे संगीतात अनेक स्वर-ताल आहेत, तसेच डोक्यात अनेक विचार आहेत.. दररोजच्या जीवनात एक विचारमाला सतत सुरू असते.  त्यात अनेक विचार येत असतात पण कुठला विचार हा विचारमालेत ठेवून जीवनाचे संगीत उत्तम करायचे हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे ... विचार अनेक येतील  पण असेच विचार निवडावे लागतील ज्यांची विचार शृंखला उद्याच्या उज्ज...

How many deaths will it take 'till he knows That too many people have died?

Image
  How many deaths will it take 'till he knows That too many people have died? प्रेमात सुंदर क्षण बोलतात डोळे झाकता हे क्षण उमलतात माझे नाही तुझे असे सांगता त हे सुदंर क्षण अर्थ उमगतो कधी तुझ्या नसण्याचा कधी तुझ्या असण्याचा सर येते पावसाची कधी उन्हाळ्यात सावलीची झाडाखाली बस आणि हे सुंदर क्षण बघ थांबूनी सुंदर च हे सगळं पण डोळे नसतात स्तब्ध ते पाहण्याकरता दिसत नाही म्हणून हे सगळं थांबलेलं सगळं थांबलेलं च असतं थांबलेली माणसं, थांबलेली झाड, आणि थांबलेलं मन पण आपणच पळतो पळतो हातच सोडून सैरभैर.. थोड स्थिरावलो तर कदाचित दिसेल अखंड शांतता थोड स्थिरावलो तर होईल खऱ्या सुंदरतेचे दर्शन थोड थांबलो तर विसावेल थोड थांबलो तर अर्थ समजेल थोड थांबलो तर थांबून कदाचित ऐकू येतील बोल अंतरीचे थांबतो थोड स्थिरावतो थोड  _ सुदर्शन जायभाय

ते झोके हिंदोळे

Image
  ते झोके हिंदोळे कोकेन चे डोहाळे  पळतो पळतो मागे मागे ती गवताची पाती फिक्कट हिरवट त्या बाजूची चुंबकाची जादू आणि दोन रुपयाची टॉफी खर्ची आंबट चिंचेची बात चेंडू फळी हातात घोट घोट संपता सुकली पाने झुरक्यात सुगीचे ते बालपण  मातीचे तेच कण कोरड्या नद्या आणि वाळवंटी तरुणपण ह्या सगळ्यांचा एक पिटारा सोडत वाटेत एक सारा परत एकदा भरून वाहू दे ती नदी एक वारी - निखील लाड (+91 70576 20470)

वाऱ्यातच सगळी उत्तरे

Image
 शब्द असतीलही कधी सोबत, कधी नसतीलही कदाचित.. शब्दांची सोबत नसतानाही समजाव्या लागतील खूपशा गोष्टी.. गोष्टी सगळ्या कशा बांधणार शब्दात,ओळीत,वाक्यात... त्या तर पसरत असतात इथून तिथे, वाऱ्यासारख्या चपळ.. मी काय लिहिणार त्यांना , त्याच रेघोट्या मारत असतात माझ्यावर सतत ... शब्दांच्या कुबड्या घ्यायला पाहतोय आजकल.. पण अपुऱ्या पडतात... शब्दच ते माणसाने बनवलेले... खोल विहिरीत डोकावून पहावं, आतला दाट अंधार बोलावतो तसे हे भाव शब्दात उतरायला पाहत असतात.. खूपदा टाळलं, पण एकट्यात असे धाडकन समोर येवून उभे राहतात.. म्हणतात लिही आम्हाला.. मग लिहितो.... एखादी दारूची अख्खी बाटली संपवत आहे , नशा करत आहे , तस अख्खं आयुष्य  एका भयानक धुंदीत चाललं आहे... ही धुंदच सत्य आहे की ह्या धुंदीच्या पलीकडे पण काही आहे का?  हे पण धुंदीत असल्याने समजत नाही... आल life आणि गेलं life.... कुठेय मी ? का मी नाहीच... ४० वर्ष, ३० वर्ष, ६० की ८० वर्ष.... संपतात डोळ्याची पापणी लवता लवता.... पहाताच राहायचं ..... माणसं, रस्ते, देखावे, अनुभव, सुंदरता , कुरूपता, सृष्टी... पाहत रहायच हे ...हे दाखवत राहतात जे.... कितीतरी जना...

एकच रंग ??

  तुझ्या आयुष्याला दुसरे पदर ही आहेतच की, बघ की जरा ते पण... एकच रंग का पांघरून घेतला आहेस तू ? दुसरे रंग कुठे आहेत, ते पहायचेच नाहीयेत का तुला ? पलीकडे पण बरच पाणी वाहत आहे, बुडावस वाटत नाही का त्या झऱ्यात तुला ? थंडगार पाणी, मन थंड करनार , डोक्याचा बर्फ करणार पाणी.. आज लिहिता झालास , लिहीत रहा.. काहीतरी चुकणारच , आपल्याला कुठ सगळं येतंय... व्यक्त व्हायला बघत असतो प्रत्येक जीव या ना त्या मार्गाने.. साचलेल बाहेर येत असत, शब्द शब्द आणि शब्द.... व्यक्त होण्याचं कौशल्य कदाचित हळू हळू सुधारेल किंवा नाहीही... पण लिहिलं तर पाहिजे .. अर्थ निघतील बरेच माझ्या म्हणण्याचे किंवा निरर्थकही वाटू शकत सगळं.. Sensitive की sensless ?? - Sudarshan

I see nothing

  This is not life. This is different. This doesn't make sense. What is this. Is this what we grow for? I see nothing. I understand nothing now. Is it a black. Does light vanished permanently. Everything seems nothing now. Everything feels like silenced down. Can there be light again? Can i became interested again? Can u think in such a way? Can you permit me  to think,to do . Can i live, breathe. Can i fly or go invisible for sometime. Can you make some sense . Can't you understand. I see nothing now, i feel nothing now. - Sudarshan

This is it

  This is it What i see , it is. It is as it is. As it is is. What u call it, a pain. Uncomfortable i am. Unbearable it is. Using words to put it. But no exact words to describe it. It is as it is , unbearable, uncomfortable. Not clear thoughts, all blurred. How u feel this pain. How u go through it. Its a luxurious to experience such thing. Luxurious pain, u can call it. U take pleasure to feel it. Sensitive or senseless?? -Sudarshan