एकच रंग ??



 



तुझ्या आयुष्याला दुसरे पदर ही आहेतच की,
बघ की जरा ते पण...

एकच रंग का पांघरून घेतला आहेस तू ?
दुसरे रंग कुठे आहेत, ते पहायचेच नाहीयेत का तुला ?

पलीकडे पण बरच पाणी वाहत आहे,
बुडावस वाटत नाही का त्या झऱ्यात तुला ?
थंडगार पाणी, मन थंड करनार , डोक्याचा बर्फ करणार पाणी..

आज लिहिता झालास , लिहीत रहा..
काहीतरी चुकणारच , आपल्याला कुठ सगळं येतंय...

व्यक्त व्हायला बघत असतो प्रत्येक जीव या ना त्या मार्गाने..
साचलेल बाहेर येत असत, शब्द शब्द आणि शब्द....

व्यक्त होण्याचं कौशल्य कदाचित हळू हळू सुधारेल किंवा नाहीही...
पण लिहिलं तर पाहिजे ..

अर्थ निघतील बरेच माझ्या म्हणण्याचे किंवा निरर्थकही वाटू शकत सगळं..
Sensitive की sensless ??

- Sudarshan



Comments

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग

देह हा पेटू दे

आपण नशीबवान आहोत