ते झोके हिंदोळे
ते झोके हिंदोळे
कोकेन चे डोहाळे
पळतो पळतो मागे मागे
ती गवताची पाती
फिक्कट हिरवट त्या बाजूची
चुंबकाची जादू
आणि दोन रुपयाची टॉफी खर्ची
आंबट चिंचेची बात
चेंडू फळी हातात
घोट घोट संपता
सुकली पाने झुरक्यात
सुगीचे ते बालपण
मातीचे तेच कण
कोरड्या नद्या आणि वाळवंटी तरुणपण
ह्या सगळ्यांचा एक पिटारा
सोडत वाटेत एक सारा
परत एकदा भरून वाहू दे
ती नदी एक वारी
- निखील लाड (+91 70576 20470)


अप्रतिम
ReplyDelete