How many deaths will it take 'till he knows That too many people have died?

 


How many deaths will it take 'till he knows
That too many people have died?

प्रेमात सुंदर क्षण बोलतात
डोळे झाकता हे क्षण उमलतात
माझे नाही तुझे असे सांगतात हे सुदंर क्षण
अर्थ उमगतो कधी तुझ्या नसण्याचा कधी तुझ्या असण्याचा

सर येते पावसाची कधी उन्हाळ्यात सावलीची
झाडाखाली बस आणि हे सुंदर क्षण बघ थांबूनी
सुंदर च हे सगळं
पण डोळे नसतात स्तब्ध ते पाहण्याकरता
दिसत नाही म्हणून हे सगळं थांबलेलं

सगळं थांबलेलं च असतं
थांबलेली माणसं, थांबलेली झाड, आणि थांबलेलं मन
पण आपणच पळतो पळतो हातच सोडून सैरभैर..

थोड स्थिरावलो तर कदाचित दिसेल अखंड शांतता
थोड स्थिरावलो तर होईल खऱ्या सुंदरतेचे दर्शन
थोड थांबलो तर विसावेल
थोड थांबलो तर अर्थ समजेल
थोड थांबलो तर थांबून कदाचित ऐकू येतील बोल अंतरीचे

थांबतो थोड

स्थिरावतो थोड 


_ सुदर्शन जायभाय

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग

देह हा पेटू दे

आपण नशीबवान आहोत