वाऱ्यातच सगळी उत्तरे
शब्द असतीलही कधी सोबत, कधी नसतीलही कदाचित..
शब्दांची सोबत नसतानाही समजाव्या लागतील खूपशा गोष्टी..
गोष्टी सगळ्या कशा बांधणार शब्दात,ओळीत,वाक्यात...
त्या तर पसरत असतात इथून तिथे, वाऱ्यासारख्या चपळ..
मी काय लिहिणार त्यांना , त्याच रेघोट्या मारत असतात माझ्यावर सतत ...
शब्दांच्या कुबड्या घ्यायला पाहतोय आजकल..
पण अपुऱ्या पडतात...
शब्दच ते माणसाने बनवलेले...
खोल विहिरीत डोकावून पहावं, आतला दाट अंधार बोलावतो तसे हे भाव शब्दात उतरायला पाहत असतात..
खूपदा टाळलं, पण एकट्यात असे धाडकन समोर येवून उभे राहतात..
म्हणतात लिही आम्हाला..
मग लिहितो....
एखादी दारूची अख्खी बाटली संपवत आहे , नशा करत आहे , तस अख्खं आयुष्य एका भयानक धुंदीत चाललं आहे...
ही धुंदच सत्य आहे की ह्या धुंदीच्या पलीकडे पण काही आहे का?
हे पण धुंदीत असल्याने समजत नाही...
आल life आणि गेलं life....
कुठेय मी ? का मी नाहीच...
४० वर्ष, ३० वर्ष, ६० की ८० वर्ष....
संपतात डोळ्याची पापणी लवता लवता....
पहाताच राहायचं .....
माणसं, रस्ते, देखावे, अनुभव, सुंदरता , कुरूपता, सृष्टी...
पाहत रहायच हे ...हे दाखवत राहतात जे....
कितीतरी जनांनी हे सर्व ह्याच डोळ्यांनी पाहिलं,
ह्याच रस्त्यावर ते फिरकले , आणि सगळं जगून आणि बघून मेले पण...
मग आपण परत कशासाठी..तीच cycle परत का??
का आपणच येतोय परत परत इथे जुन्या चुका सुधारण्यासाठी ??
१२.०५ रात्री , पुणे
सुंदर..
ReplyDeleteजुन्या चूका सुधारण्यासाठी आणि परत येण्याची सोय म्हणून नवीन चूका करण्यासाठी...............निरर्थक आहे की अर्थपुर्ण.....???????
ReplyDeleteShevtchi kadve aprtip ...mnatl vyakt kely hya poem madun.
ReplyDelete