पहिला ब्लॉग

सुटायचय .........


 



तिने तिथेच सोडून दिलं सगळं, आहे तस.....

वेळही नव्हती अस सर्व मधून सोडून जायची..

पण तिला ते सोडायचं होत, तिन सोडलं, आणि झाली मोकळी...

श्वास घेतला मोकळा तिने...तिला हलकं वाटलं ...पुढचा प्रवास हलका हलकासा वाटत होता तिला...

जड झाल होत बरच, म्हणून तिने सर्व सोडलं मध्येच...

आता काय तर चालत राहायचं, रस्ता आहे म्हटल्यावर चालायचं..

कुठेही जा , वाटा तर असणारच, आपलं काम चालायच, चालत राहायचं..

थकलीस ग बाई तू खूप , पण तुला चालणं भाग आहे..


कधी ती व्यक्त झाली, कधी अव्यक्त राहिली..

जग तिच्याकडं पहायचं फक्त , त्या अव्यक्तपणाला समजून घ्यावं असं कधी वाटलं का कुणाला...

तिला बऱ्याचदा म्हणायचं होत खूप काही , पण ती नाही म्हणाली..her eyes spoke instead, but very few understood it...

बहुतेक अशा अव्यक्त होण्यातच तिला तीच 'स्त्रीत्व' जपण्याच समाधान वाटत असावं.....


खूप वेळा वाटलं होत तिला की सुटाव...

आज ती सुटली, तिला बर वाटलं, मोकळं वाटलं..

आता पुढं पण वाट दिसत आहे , ती चालायची....


- Sudarshan Jaybhay





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

देह हा पेटू दे

आपण नशीबवान आहोत