संगीत आणि मनातले विचार (By Ashwini Bhosale)


 

स्वर - तालाच्या दुनियेत मानवी मन अगदी सहज रममाण होतं असतं. असा एकही मनुष्य नसेल की त्याला यातलं एकही आवडत नसेल . अगदी सर्वात निरस व्यक्तीला सुद्धा यातला एखादा तरी प्रकार नक्कीच आवडत असेल.

प्रत्येक स्वराचे, प्रत्येक तालाचे त्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे, त्याला स्वतःचे एक अस्तित्व आहे . तालाचे योग्य मिश्रण हे उत्तम संगीत बनू शकते तर स्वरांचे योग्य मिश्रण एक गाणं बनवू शकते.

या तालाची गंमत म्हणजे यांची गुंफण योग्य होण.... एखादा ताल वेगळा आला तर कदाचित संगीताची लय बदलू शकते आणि कदाचित ते अगदी अश्रवणीय ठरू शकते किंवा कदाचित ते उत्तम आश्चर्य असलेले सुद्धा होऊ शकते.  मग याची खातरजमा तुम्हाला स्वर तालाची प्रॅक्टिस करतानाच करावी लागते.

तसेच डोक्यातील विचारांचे असते जसे संगीतात अनेक स्वर-ताल आहेत, तसेच डोक्यात अनेक विचार आहेत.. दररोजच्या जीवनात एक विचारमाला सतत सुरू असते.

 त्यात अनेक विचार येत असतात पण कुठला विचार हा विचारमालेत ठेवून जीवनाचे संगीत उत्तम करायचे हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे ... विचार अनेक येतील  पण असेच विचार निवडावे लागतील ज्यांची विचार शृंखला उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आजच्या क्षणांना योग्य न्याय देईल.... कधीकधी विचार बरोबर असला तरी तो विचार करण्याची किंवा विचार मांडण्याची वेळ बरोबर नसते त्यामुळे त्याचा विचार करूनच विचारांची निवड करावी तर जीवनाचे संगीत सुंदर होईल.


- अश्र्विनी भोसले

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग

देह हा पेटू दे

आपण नशीबवान आहोत